आता पर्यंतची सर्वात महाग गाडी ‘बुगाटी’ने विकली एवढ्या कोटींना

bugatti
स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे सुरु असलेल्या ‘जिनेव्हा मोटर शो २०१९’मध्ये जगप्रसिद्ध ‘बुगाटी’ या वाहन कंपनीने आपली आतापर्यंतची त्यांची सर्वात महाग कार लाँच केली असून त्यांनी या गाडीला‘ला व्हॉयटूर नोएरी’ असे फ्रेंच नाव दिले आहे. दरम्यान कंपनीने या गाडीचे एकच मॉडेल तयार करण्यात आल्याचे सांगितले आहे.
bugatti3
त्याचबरोबर ही गाडी १३२ कोटींना विकण्यात आल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष स्टीफन विंकलमॅन यांनी दिली आहे. आत्तापर्यंतची बुगाटीची १३२ कोटींना विकण्यात आलेली ही गाडी सर्वात महागडी गाडी ठरली आहे. पण ही गाडी कोणी विकत घेतली याची माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.
bugatti1
गाडी आणि ती बनवण्यामागील संकल्पनेसंदर्भात गाडीच्या लॉन्चिंग सोहळ्यामध्ये स्टीफन यांनी माहिती दिली. बुगाटी कायमच विशेष प्रोडक्ट देण्याचा प्रयत्न करते. आता ला व्हॉयटूर नोएरी सारख्या गाड्यांच्या माध्यमातून बुगाटी भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करत असून वेग, तंत्रज्ञान, लक्झरी आणि सौंदर्याचा अनोखा मिलाफ या गाडीमध्ये पहायला मिळणार असून आमच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाला दिलेली ही गाडी मानवंदना ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
bugatti2
या गाडीचा प्रत्येक भाग हँडमेड असून यात मशीन्सचा कमीत कमी वापर करण्यात आला आहे. या गाडीला चकाकी कार्बन फायबर बॉडीमुळे असणारा काळा रंग शोभून दिसतो, असे मत गाडीचा डिझायनर इटियेन सलोमे याने गाडीबद्दल बोलताना व्यक्त केले आहे. ही गाडी बनवण्यासाठी आम्ही बरीच मेहनत घेतली असून ही आमच्यासाठी सर्वात परफेक्ट गाडी असल्याचे समोले यांनी सांगितले. ८ लिटरचे १६ सिलेंडर असणारे इंजिन या गाडीमध्ये आहे. गाडीमध्ये १ हजार ४७९.४७ बीएचपीची आणि १ हजार ६०० एनएम टॉर्कची शक्ती या कारमध्ये आहे.

Leave a Comment