12 वर्षापूर्वी गिफ्ट मिळालेली ‘रॉल्स रॉयस’ अमिताभ बच्चन यांनी विकली

amitabh-bachhan
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना देखील नव्या गाड्यांचा शौक असल्यामुळेच त्यांच्या ताफ्यात आजही महागड्या गाड्यांचा समावेश असल्याचे दिसून येते. त्यातच त्यांनी नुकतीच आपल्या ताफ्यातील एक गाडी विकली आहे. 12 वर्षापूर्वी एका निर्मात्याने ही गाडी त्यांना गिफ्ट म्हणून दिली होती.

आपल्या महागड्या गाड्यांच्या ताफ्यातील ‘रॉल्स रॉयस’ ही आलिशान गाडी अमिताभ यांनी विकली आहे. ही गाडी म्हैसूरस्थित एका व्यावसायिकाने विकत घेतली आहे. अनेक महागड्या गाड्या या व्यावसायिकाकडे देखील आहेत. पण या व्यावसायिकाला बिग बींची गाडी खरेदी केल्यामुळे प्रचंड आनंद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, रॉल्स रॉयस ही गाडी २००७ मध्ये एकलव्य चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी विधू विनोद चोपडा यांनी दिली होती. अमिताभ यांची या चित्रपटामुळे कलाविश्वात नवी ओळख निर्माण झाली होती. विधू चोपडा यांनी अमिताभ यांना चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयामुळे भेट म्हणून ही गाडी दिली होती. या गाडीची किंमत त्यावेळी ३.५ कोटी रुपये होती. त्यामुळे ही गाडी अमिताभ यांच्यासाठी खूप खास होती.

Leave a Comment