मुलीच्या लग्नासाठी अनोखी टुर्नामेंट, जिंकल्यास मिळणार 2 कोटी रूपये !

wedding
आजवर आपण अनेक स्वयंवर पाहिले असतील. पण सध्या सोशल मीडियात अशाच काही स्वयंवराची बातमी व्हायरल होत आहे. हा स्वयंवर आहे थायलंड कोट्याधीश उद्योगपती आरनॉन रोदथोंग यांच्या मुलीचा. ते सध्या आपल्या मुलीच्या लग्नासाठी मुलगा शोधत आहेत. पण त्यांनी यासाठी एका अनोख्या टूर्नामेंटचे आयोजन केले आहे. ही टूर्नामेंट जो जिंकले त्याच्याशी ते आपल्या मुलीचे लग्न तर लावून देणार आहेतच, त्याबरोबर ते विजेत्याला 2 कोटी 21 लाख रुपयांचे बक्षीस सुद्धा देणार आहेत. मग तुम्ही जाणार का ती टूर्नामेंट खेळायला.
wedding1
थायलंडचे उद्योगपती आरनॉन रोदथोंग यांची 26 वर्षीय मुलगी कर्णसिटा रोदथोंग हिच्या लग्नासाठी तीन अटी ठेवल्या आहेत. त्यानुसारच ते आपल्या मुलीचे लग्न लावून देणार आहेत. जो नवरा मुलगा ही टुर्नामेंट जिंकेल त्याला जवळपास 2 कोटी 21 लाख रुपयांसोबतच आरनॉन रोदथोंग यांचा कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय देखील मिळणार आहे.
wedding2
सोशल मीडियात आरनॉन यांनी एक पोस्ट शेअर करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी त्यात काही अटीही सांगितल्या. त्यातील पहिली अट म्हणजे मुलगा सुंदर असो वा नसो पण तो सुशिक्षित असावा. चायनीज आणि इंग्रजी त्याला वाचता आणि बोलता यायला हवे. तसेच दुसरी अट अशी आहे की, त्यांच्या मुलीचे लग्न त्यांना आळशी मुलाशी करून द्यायचे नाहीये. मुलगा मेहनती असायला हवा.
wedding3
दरम्यान आरनॉन हे डूरियन नामक दुर्गंधी युक्त फळाचे व्यापारी असून आरनॉन यांना असे वाटते की, त्यांच्या मुलीशी लग्न करणाऱ्या मुलाला डूरियन फळाबाबत पूर्ण माहिती असावी. आरनॉन जावई शोधण्यासाठी एका टुर्नामेंटचे आयोजन करणार आहेत. अनेक मुलांनी यासाठी अर्जही केला आहे. मुलांच्या माहितीची यात तपासणी केली जाईल. मुलांना डूरियन व्यवसायाची किती माहिती आहे हे सुद्धा तपासले जाणार आहे. १ एप्रिल रोजी थायलॅंडमधील पटायामध्ये ही टुर्नामेंट होणार आहे.

Leave a Comment