भर मैदानात धोनी आणि त्याच्या चाहत्याचा पकडा पकडीचा खेळ

dhoni
एखाद्या सेलिब्रेटीला भेटण्याच्या नादात त्यांचे चाहते काय करुन बसतील त्याचा नेम नाही. त्यातच गेल्या काही दिवसात क्रिकेट सामन्याच्या आधी किंवा नंतर सुरक्षा कवच भेदून क्रिकेटचे चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंना भेटायला जात असल्याचा अनुभव आला आहे.
dhoni1
महेंद्रसिंह धोनीला देखील असा ताजा अनुभव आला आहे. नागपूरमध्ये काल खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय टीम क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर आली आणि त्यांच्या पाठोपाठ एक माणूसही त्यांच्यात आत घुसला. पण आपल्या कूल शैलीत धोनीने देखील आपल्या फॅनचीही फिरकी घेतली. हा फॅन आपल्याला भेटायला येत आहे हे बघून धोनी चक्क धावत सुटला.
dhoni2
हा फॅन पकडा पकडीच्या खेळासारखा इतर खेळाडूंमधून धावत अखेर धोनीला भेटला. आपल्या फॅनची गंमत करायची संधी धोनीने सोडली नाही. सोशल मीडियावर याचादेखील व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.

Leave a Comment