वयाच्या २१ व्या वर्षी अब्जाधीशांच्या यादीत विराजमान झाली काईली जेनर

Kylie-Jenner
किम कार्दाशिअन हिची ती सावत्र बहिण असलेली मॉडेल अभिनेत्री काईली जेनरने अब्जाधीशांच्या यादीत पुन्हा एकदा स्थान पटकावले आहे. वयाच्या २१ व्या वर्षी काईलीचा अब्जाधीशांच्या यादीत समावेश झाला आहे.

ती प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधन कंपनी ‘काईली कॉस्मेटिक्स’ची मालकीन आहे. काईलीने २०१५ च्या अखेरीस ‘काईली कॉस्मेटिक्स’ या कंपनीची स्थापना केली. तिची कंपनी ओठांना अधिक आकर्षक करण्यासाठीची सौंदर्यप्रसाधने तयार करते. २०१८ मध्ये काईलीची एकूण संपत्ती ही ६१ अब्ज ७४ कोटींच्या घरात होती असे ‘फोर्ब्स’ने म्हटले होते. जगातील अब्जावधी व्यक्तींची यादी नुकतीच ‘फोर्ब्स’ने जाहीर केली. तिने या यादीत स्थान मिळवले आहे. काईलीने गेल्यावर्षी फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गलाही मागे टाकले होते. वयाच्या २३ व्या वर्षी याआधी मार्क झकरबर्ग अब्जाधीश झाला होता तर विसाव्या वर्षी काईलीने अब्जाधीशांच्या यादीत विराजमान होण्याचा मान मिळवला होता.

Leave a Comment