पंतप्रधान मोदींची हत्या करायला पाहिजे, कर्नाटकातील काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

congress
बंगळुरू – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कर्नाटकातील एका काँग्रेस नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले असून काँग्रेस नेते बेलूर गोपालकृष्णा यांनी पक्षाच्या एका आहे. पक्षाच्या एका जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची हत्या करायला पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. पण त्यांच्या वक्तव्यावरुन वाद सुरु झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.

कर्नाटक भाजपने या वक्तव्यानंतर बेलूर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या पंतप्रधान मोदींची हत्या करण्याचे भडकावू वक्तव्य देशासाठी घातक असून बेलूर यांच्यावर गृहमंत्रालय आणि बंगळुरू पोलीस आयुक्त यांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

बेलूर आपल्या स्पष्टीकरणात म्हणाले, की फक्त गांधीच्या हत्येशी मी त्यांची तुलना केली. कोणी जर महात्मा गांधीचा अपमान करत असेल, तर मी शांत का बसू? तशाच प्रकारची वागणूक मोदींना दिली पाहिजे, असे म्हटल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. बेलूर यापूर्वी भाजपमध्ये होते. परंतु शिवमोगा येथून भाजपने टिकीट नाकारल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Leave a Comment