सुंदर मणिपूरची सुंदर राजधानी इंफाळ

imphal
ईशान्येकडे असलेले सेव्हन सिस्टरपैकी एक मणिपूर हे राज्य म्हणजे निसर्गाचा वरदहस्त लाभलेले शांत आणि सुंदर राज्य आहे. या राज्याची राजधानी इंफाळ अतिशय सुंदर शहर असून पर्यटकांना लुभावातील अशी अनेक ठिकाणे येथे आहेत. इथला निर्सग जितका रमणीय आहेत तितकेच येथील नागरिकही अतिशय मनमिळावू, मदतीस नेहमी तयार आणि पर्यटकांना चटकन आपलेसे करून घेणारे आहेत.

नोव्हेंबर ते एप्रिल हा सिझन मणिपूरला भेट देण्यासाठी अतिशय चांगला असतो. सात पहाडानी घेरलेल्या इंफाळ मध्ये सर्वप्रथम वॉर सिमेट्रीला भेट द्यावी. दुसरया महायुद्धात स्हीफ झालेल्या भारतीय आणि ब्रिटीश सैनिकांना श्रद्धांजली देण्यासाठी त्याची उभारणी केली गेली होती.

lokatak
येथील शासक महाल जवळ असलेले गोविंदजी मंदिर अगदी साधे आहे पण येथून दिसणाऱ्या निसर्गाचे सौंदर्य काही आगळेच. हा परिसर इतका शांत आहे कि नास्तिकाचेही अध्यात्माशी नाते अपोआप जोडले जाते. येथील लोकतक सरोवर म्हणजे निसर्गाचा अद्भुत नामुमा. ताज्या पाण्याचे हे सर्वात मोठे सरोवर असून यात अनेक छोटी तरंगती बेटे आहेत. बोटिंग, कयाकिंग, वॉटर स्पोर्टचा आनंद येथे घेता येतो. संगाई नावाच्या दुर्लभ हरणांचे निवासस्थान मानले जाणारे केबुल लमजाओ राष्ट्रीय उद्यान येथून जवळ आहे.

imma-market
येथील एम्मा मार्केट हे खास आकर्षण. हा बाजार संपूर्णपणे महिलांच्या ताब्यात आहे. एम्मा म्हणजे आई. महिला संचालित करत असलेल्या हा जगातील सर्वात मोठा बाजार आहे. येथे पारंपारिक मणिपुरी हातमाग कापडापासून ते घरगुती वापराच्या वस्तू, भाजीपाला, फळे असा सर्व प्रकारचा माल मिळतो. बांबू पासून बनविल्या जाणार्या डेकोरेटिव्ह वस्तू येथे फार सुंदर मिळतात. त्याचबरोबर शाली, स्वेटर, मणिपुरी दागिने, कपडेही मिळतात.
————-

Leave a Comment