सैफची मुलगी होणार पुजा बेदीची लेक

aaliya-furniturewala
लवकरच बॉलिवूडमध्ये आणखी एका स्टारकिडची एंट्री होणार आहे. ती स्टारकिड आहे अभिनेत्री पूजा बेदीची लेक आलिया फर्निचरवाला आणि सध्याच्या घडीला आलियाच्या नावाचीच चर्चा बी टाऊनमध्ये होत आहे. आलिया आपल्या पहिल्याच चित्रपटात सैफ अली खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. आलिया या चित्रपटात सैफ अली खानच्या मुलीच्या भूमिकेत झळकणार आहे.

चित्रपटाचे नाव अद्याप तरी समोर आलेले नाही. पण या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली असल्यामुळे आलिया आपल्या पहिल्यावहिल्या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक असल्याचे तिने सांगितले. त्याचबरोबर माझ्यासाठी यंदाचं वर्ष खास आहे. पहिल्यांदाच मी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. केवळ मीच नाही तर माझ्यासोबत अनन्या पांडे आणि आणखी काही स्टारकिडही या क्षेत्रात पदार्पण करणार आहे. आता बॉलीवूडमध्ये एक नवी पिढी येत आहेत. बॉलिवूडमध्ये सध्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती होत असल्यामुळे आमच्या साऱ्यांच्या चित्रपटांच्या कथाही एकमेकांपासून प्रचंड भिन्न असल्याचे आलिया म्हणाली.

आपल्या चित्रपटातील भूमिकेबाबत आलिया म्हणते, माझ्या वाट्याला आलेली भूमिका ही अगदी माझ्या खऱ्या आयुष्यासारखी असल्यामुळे ही भूमिका साकारत असताना मला विशेष मेहनत घ्यावी लागली नाही. सैफ अली खान यांच्यासोबत या चित्रपटात मला काम करण्याची संधी मिळणार आहे ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.

Leave a Comment