मसूद अजहरच्या नाड्या आवळण्यासाठी मास्टरप्लान तयार

masud
पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि भारतासाठी मोस्ट वाँटेड असलेला मसूद अजहर याच्या नाड्या आवळण्यासाठी भारताने मास्टरप्लान तयार केला असल्याचे समजते. या प्लानच्या आखणीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. या संदर्भात पंतप्रधान मोदी याच्या उपस्थितीत रविवारी नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलची महत्वाची बैठक पार पडल्याचे वृत्त आहे. यात मोदी यांनी या प्लानना हिरवा सिग्नल दिला असल्याचे सांगितले जात आहे.

पंतप्रधान मोदी यांची इच्छा मसूदला जिवंत पकडावे अशी आहे. पाकिस्तान कोणत्याही परिस्थितीत त्याला भारताच्या ताब्यात देणार नाही उलट त्याला पाक सरकार आणि लष्कर सुरक्षा देत आहे. मसूद साठी भारतालाच काही ठोस कृती करावी लागणार असून त्यासाठी दोन योजना आखल्या गेल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पहिली राजनीतिक असून त्यात राष्ट्र सुरक्षा परिषदेची कारवाईसाठी मंजुरी मिळविण्याचा समावेश आहे. दुसरा प्लान अधिक धोकादायक असून त्यात कमांडो कारवाईचा समावेश आहे. अमेरिकेने ओसामा बिन लादेनला ज्याप्रमाणे पाकिस्तानात घुसून ठार केले त्याप्रकारची हि कमांडो कारवाई असेल असे समजते. दोन्ही योजनांवर सध्या काम सुरु आहे अशी माहिती मिळाली आहे.

Leave a Comment