मुंबईत देशातील पहिला मोनो रेल मार्ग पूर्ण

monorel
महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई मध्ये देशातील पहिला मोनो रेल मार्ग पूर्ण झाला असून या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याची चाचणी सोमवारी यशस्वी झाली आहे. या मुळे दीड तासाचा प्रवास ३० मिनिटात होणार आहे. १९.५४ किलोमीटर लांबीच्या या मार्गावर दररोज ९० हजार प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.

रेल्वे, लोकल, मेट्रो आणि मोनो रेलची सुविधा असलेले मुंबई हे देशातील पहिले शहर बनले असून सर्वाधिक लांबीचा मोनो रेल मार्ग असलेले जगातील चार नंबरचे शहर बनले आहे. या नेटवर्कचा पहिला टप्पा ८.२ किमी चा होता आणि दुसरा टप्पा ११.२८ किमीचा आहे. या मार्गावर ३ डब्याची मोनो रेल धावणार असून तिचा प्रवास २२ मिनिटांचा असेल. सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत मोनो रेल सुरु राहील. या मार्गावर १८ थांबे आहेत. किमान भाडे १० रुपये आहे तर कमाल भाडे ४० रुपये आकारले जाणार आहे.

Leave a Comment