या देशाच्या सरकारवर तुरुंग बंद करण्याची पाळी

netherlnd
जगाच्या पाठीवर कुठल्याची देशात तुरुंग हि आवश्यक बाब असताना नेदरलंड सरकारला वेगळीच समस्या सतावत आहे. या देशात गुन्हेगारीचे प्रमाण जवळजवळ शून्यावर आले आहे आणि त्यामुळे सरकारने देशातील तुरुंग बंद करण्याचा निर्णय घेऊन त्याची कार्यवाही सुरु केली आहे.

सद्यस्थितीत या देशाच्या अनेक तुरुंगात एकही कैदी नाही. १ कोटी ७१ लाख ३२ हजार लोकसंख्या असलेल्या या देशात २००३ साली १९ कैदी होते मात्र आत्ता ते सर्व सुटले आहेत. त्यामुळे तुरुंग रिकामी आहेत. तुरुंग बंद केल्याचा फटका तुरुंग कर्मचाऱ्याना बसणार आहे. येथे तुरुंगात नोकरी करणारे २ हजार लोक आहेत त्यापैकी ७०० लोकांच्या बदल्या अन्य खात्यात केल्या गेल्या आहेत आणि उरलेल्या १३०० लोकांसाठी सरकार नोकरी देण्याचा प्रयत्न करत आहे.

जगाच्या पाठीवरचा हा सर्वात सुरक्षित देश आहे. येथे कैद्यांसाठी इलेक्ट्रोनिक अँकल मॉनीटरिंग सिस्टीम वापरली जाते. म्हणजे एकप्रकारचे कडे कैद्यांना घातले जाते. कैद्यांना सीमेच्या आत राहा अशी सूचना असते पण त्यातूनही कुणी बाहेर येण्याचा प्रयत्न केला तर यस सिस्टीममुळे त्याची सूचना पोलिसांना त्वरित मिळते. तसेच कैद्याचे लोकेशन समजते. यामुळे गुन्हे खूपच कमी झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

Leave a Comment