ट्रोलर्संना लगाम घालणार ट्विटर

twitter
लवकरच एक मोठ फिचर मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटर लाँच करण्याच्या तयारीत असून जेव्हा ट्विटरचे हे फिचर येईल तेव्हापासून ट्विटर ट्रोल होणाऱ्यांची सुटका होण्याची शक्यता आहे. ट्विटर सध्या आपल्या प्लॅटफॉर्मवर हाईड रिप्लाय फिचरची टेस्टिंग करत असून हे फिचर लाईव्ह झाल्यानंतर यूझरकडे नको असलेला रिप्लाय हाईड करण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे.

यूझर आपल्या पोस्टवर आलेल्या नकोसे असणारे रिप्लाय हाईड करू शकणार आहेत. यामुळे तुम्ही लवकरच ट्विटरवर कोणत्याही ट्विटमध्ये रिप्लाय हाईड करू शकणार. ट्विटरचे सीनिअर प्रोडक्ट मॅनेजर मिशेल यासमिन हक यांच्या एका ट्विटच्या माध्यमातून ही माहिती मिळाली आहे. या फिचरचा सर्वात मोठा फायदा असणार की जर कोणी तुम्हाला ट्रोल करण्याचा प्रयत्न करेल तर तुम्ही त्याचा रिप्लाय हाईड करू शकणार आहात. मात्र हे फिचर यूझर्ससाठी कधी उपलब्ध होणार याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

Leave a Comment