फक्त झाडे पाडण्यासाठी घडवून आणला होता का भाजपने एरियल स्ट्राईक ?

navjyot-singh-sidhu
नवी दिल्ली – 14 फेब्रुवारीला सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर पुलवाम येथे झालेल्या हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या एरियल स्ट्राईकचे संपूर्ण देशातून कौतूक होत असून देशातील सर्वच नागरिकांना हवाईच्या कारवाईचा अभिमान आहे. पण त्या एरियल स्ट्राईकवरुनच सध्या राजकारण पेटले आहे. एरियल स्ट्राईकमध्ये मारले गेलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह दाखवा म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पुराव मागितले आहेत तर पंजाब सरकारचे आरोग्य मंत्री नवज्योत सिंह सिद्धु यांनी भाजपने हा एरियल स्ट्राईक तेथील झाडे पाडण्यासाठी केला होता का ? असा सवाल उपस्थित केला आहे.

केंद्रातील भाजप सरकारकडून हवाई दलाकडून करण्यात आलेल्या एरियल स्ट्राईकमध्ये 300 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा करण्यात येत आहे. पण या दाव्यावर नवज्योतसिंह सिद्धू यांनी प्रश्न उपस्थित करत भाजपने एरियल स्ट्राईक तेथील झाडे पाडण्यासाठी घडवून आणला होता का? असे म्हटले आहे.

नवज्योत सिंह सिद्धू यांनी तुमचा एरियल स्ट्राईक मागील उद्देश काय होता? तेथील झाडे पाडणे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे बोलत आहात? असे प्रश्न विचारत भाजपवर निशाणा साधला आहे. लष्कराने, हवाई दलाने केलेल्या कारवाईवरुन सध्या सुरु असलेले राजकारण थांबवण्याचा सल्ला सिद्धू यांनी दिला आहे.

Leave a Comment