
जम्मू – दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात त्राल येथे चकमक सुरु असून आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाच्या जवानांनी खात्मा केला आहे. दोन्ही बाजूंनी मागच्या तासाभरापासून गोळीबार सुरु होता. ज्या घरात दहशतवादी लपून बसले होते तिथे स्फोट झाला आहे.
सुरक्षा दलाच्या जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा
सुरक्षा दलाच्या जवानांना त्रालमधील एका घरात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी रात्री आठच्या सुमारास सुरक्षादलांनी या भागाला घेराव घातला. दहशतवादी आणि जवानांमध्ये पहाटे साडेचारपासून चकमक सुरु झाली. दोन दहशतवादी घरामध्ये लपले असल्याची माहिती मिळाली होती. सध्या गोळीबार थांबला असून शोधमोहिम सुरु आहे. ४२ राष्ट्रीय रायफल, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस या मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत.
