एअर इंडियाच्या विमानातील खाद्यपदार्थावर डल्ला मारणारे कर्मचारी निलंबित

air-india
नवी दिल्ली – सरकारी विमान कंपनी एअर इंडियाच्या चार कर्मचाऱ्यांवर अनुशासनात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या चारही कर्मचाऱ्यांवर विमानातील खाद्यपदार्थ चोरी केल्याचा आरोप आहे.

2017 मध्ये एअर इंडियाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अश्विनी लोहानी यांनी कंपनीला एक पत्र लिहिले होते. त्यांनी त्या पत्रामध्ये विमानाच्या उड्डाणानंतर काही कर्मचारी उरलेले अन्न पदार्थ आणि किराणा खासगी उपयोगासाठी वापरत असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर त्यांनी आपल्या पत्रात अशी चोरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी असेही त्यांनी म्हटले होते. एअर इंडियाच्या चार कर्मचाऱ्यांना त्यानंतर निलंबित करण्यात आले. याबाबत एअर इंडियाकडे विचारणा केली असता कंपनीने कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही.

Leave a Comment