भूतियाचा पक्ष सिक्कीममधील सर्व जागा लढवणार

Baichung-Bhutia
गंगटोक : सिक्कीममधील एकमेव लोकसभा जागा तसेच विधानसभेच्या सर्व म्हणजे ३२ जागा लढविण्याचा निर्णय राजकारणात प्रवेश केलेले माजी फुटबॉलपटू बायचुंग भूतिया यांच्या हमरो सिक्कीम पार्टी (एचएसपी) या पक्षाने घेतला आहे. हमरो सिक्कीम, न्यू सिक्कीम अशी निवडणुकांसाठी घोषणा आमच्या पक्षाने तयार केल्याचे त्यांनी सांगितले. सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचा मुकाबला करण्यासाठी प्रादेशिक पक्षांच्या आघाडीत एचएसपी सामील होऊ शकतो.

दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला रामराम केला होता. फुटबॉलमधून निवृत्त झाल्यानंतर भुतियाने २०१३मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर २०१४मध्ये दार्जिलिंगमधून लोकसभेची निवडणूकही भुतियाने लढवली. पण निवडणुकीत एस.एस. अहलुवालीया यांनी त्याचा पराभव केला.

Leave a Comment