लग्न लपविण्यासाठी विराट कोहली आणि अनुष्का शर्माने केले हे काम

vriushka
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे 2017 साली विवाह बंधनात अडकले. त्यांच्या विवाहाची बातमी अचानक आल्याने अनेकजण आश्चर्यचकित झाले होते. दोघेही सेलिब्रेटी असल्यामुळे आपल्या लग्नाची गोष्ट गुप्त ठेवण्यासाठी या दोघांनी इटलीमध्ये लग्न केले. जेथे फक्त कुटुंब आणि मित्र उपस्थित होते. एका फॅशन मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत अनुष्का शर्मा म्हणाली की, आम्ही आधीच विचार केला होता आपल्या लग्नाची वाच्यता कोठे ही करायची नव्हती आणि लग्नात फक्त मोजकेच लोक उपस्थित असतील.

अनुष्का म्हणाली, आम्ही आधीपासूनच विचार केला होता की आपला विवाह अशा प्रकारचा असेल की आपण दोघे, आपले कुटुंबीय आणि मित्र तिथे उपस्थित असतील. आम्हाला कोणत्याही थाटामाटात लग्न करायचे नव्हते. त्याचबरोबर आम्ही आमच्या कॅटररला देखील चुकीचे नाव सांगितले होते. कदाचित विराट राहुल झाला होता, विराट आणि अनुष्का दोघांनाही आपल्या लग्नाची गुप्तता बाळगायची होती आणि त्याचबरोबर मोजक्याच लोकांना आमच्या लग्नाबद्दल माहित असेल. त्यामुळेच आम्ही लग्नाची तयारी गुप्त पद्धतीने केली. त्यानुसार 11 डिसेंबर 2017 रोजी आम्ही विवाह बंधनात अडकलो आणि सोशल मीडियावर त्याचे फोटो पोस्ट केले. ते खुप व्हायरल देखील झाले होते. त्यानंतर विराट दक्षिण अफ्रीका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला. त्यावेळी अनुष्का देखील त्याच्यासोबत होती.

Leave a Comment