पब्जी खेळण्याच्या नादात पाणी समजून प्यायला अॅसिड!

PUBG
भोपाळ : पब्जी या गेममुळे अनेक तरुण-तरुणींनी आपला जीव गमावल्याच्या बातम्या आपण गेल्या काही दिवसात ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. पण मध्य प्रदेशच्या भोपाळमधील 25 वर्षीय तरुणाने पब्जी खेळण्याच्या नादात पाण्याऐवजी अॅसिड प्यायला. तरुणाला या घटनेनंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे सुदैवाने त्याचा जीव बचावला आहे.

भोपाळमधील तरुण घराच्या बाहेरील जागेत पब्जी गेम खेळत होता. तो हा गेम खेळण्यात एवढा गुंग झाला की त्याने पाण्याऐवजी अॅसिड प्यायला. तरुणाला त्यानंतर तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यामुळे त्याचा जीव वाचला. या तरुणाची तब्येत सध्या ठीक असल्याचे उपचार करणारे डॉ. गोगिया यांनी सांगितले. अॅसिड प्यायल्याने तरुणाचा घसा जळला आहे. तसेच, त्याच्या पोटात अल्सर झाले आहे आणि आतडे जळाले आहेत. मात्र आता त्याची तब्येत ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान एवढे घडल्यानंतरही हा तरुण रुग्णालयातही पबजी खेळत होता. अगदी उपचार सुरु असतानाही, पबजी गेम खेळत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले.

Leave a Comment