
नवी दिल्ली : प्रत्येक उड्डाणाच्या घोषणेनंतर एअर इंडियाच्या क्रू मेंबर्सना पूर्ण जोशाने ‘जय हिंद’ बोलणे यापुढे अनिवार्य असणार आहे. सर्व कॅबिन क्रू आणि कॉकपिटमधील क्रू मेंबर्सना विमान प्रवासादरम्यान तशा सुचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
एअर इंडियाच्या विमानात क्रू मेंबर्सना यापुढे बोलावे लागणार ‘जय हिंद’
मे 2016 मध्ये आपल्या वैमानिकांना ‘जय हिंद’ बोलण्याच्या सूचना एअर इंडियाचे तत्कालीन चेअरमन आश्वनी लोहानी यांनी दिल्या होत्या. विमानाच्या कॅप्टनने प्रवासात सदैव आपल्या प्रवाशांशी जोडलेले असणे गरजेचे असून ‘जय हिंद’ बोलल्याने मोठा परिणाम होतो.
