एरियल स्ट्राईक दरम्यान जैशच्या तळावर कार्यरत होते 300 मोबाईल

aerial-strike
नवी दिल्ली : २६ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी अड्ड्यावर भारतीय हवाई दलाने एरियल स्ट्राईक केला. जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यावर या हल्ल्याआधी ३०० मोबाईल सुरू होते, अशी माहिती आता समोर आली आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्वा भागात हल्ला करण्याची भारतीय हवाई दलाला परवानगी दिल्यानंतर एनटीआरओ(नॅशनल टेकनिकल रिसर्च ऑर्गनायजेशन)ने जैश-ए-मोहम्मदच्या या तळावर पाळत ठेवली होती.

१२ मिराज २००० विमाने २६ फेब्रुवारीला बालाकोटमध्ये घुसली आणि जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यावर एक हजार किलोचे २ बॉम्ब टाकले. एरियल स्ट्राईकच्या आधी बालाकोटमधील जैशच्या त्या दहशतवादी तळावर ३०० मोबाईल सुरू होते. या अड्ड्याचा आम्ही खात्मा केला. गुप्तचर यंत्रणांनी दिलेली बालाकोटमध्ये असलेल्या एकूण दहशतवाद्यांच्या संख्येला एनटीआरओच्या माहितीमुळे पुष्टी मिळाल्याचे या ऑपरेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या एकाने सांगितल्याचे वृत्त एका वृत्त संस्थेने दिले आहे.

Leave a Comment