शहीद उधम सिंह यांच्या भूमिकेत झळकणार विकी कौशल

vicky-kaushal
भारतीय लष्कराने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’या चित्रपटात विकी कौशलने साकारलेल्या भूमिकेनंतर त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट विकीच्या कारकिर्दीतला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आणि त्यानंतर चित्रपटांची अक्षरशः रांगच लागली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यातच आता विकीच्या झोळीत आणखी एक देशभक्तीपर चित्रपट पडला आहे. विकी लवकरच दिग्दर्शक शूजित सरकार यांच्या आगामी उधम सिंह या चित्रपटात झळकणार आहे.

शहीद स्वातंत्र्यसैनिक उधम सिंह यांच्या जीवनावर उधम सिंह हा चित्रपट आधारित असून स्वातंत्र्यपूर्व काळ या चित्रपटामध्ये दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणाला पुढील महिन्यात सुरुवात होणार असून विकी आणि शूजित या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

या चित्रपटाबाबत माहिती देताना शूजित सरकार सांगतो की, विकीच्या कारकिर्दीचा आलेख पाहिला तर आपल्या लक्षात येते की तो नेहमी वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची निवड करतो. तो त्याच्या चित्रपटांमध्ये कायम आव्हानात्मक भूमिका करण्याचा प्रयत्न करत असतो. मला अशाच अभिनेत्याची माझ्या आगामी चित्रपटासाठी गरज होती,

Leave a Comment