कोटाचे मुर्तझा पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांना देणार 110 कोटी रुपये

murtuza-ali
कोटा (राजस्थान) – कोटा रहिवाशी आणि मुंबईत वैज्ञानिक म्हणून काम करणारे मुर्तझा अली शहिद जवानांच्या कुटुंबियांसाठी पंतप्रधान सहायत्ता मदत निधीत 110 कोटी रुपये मदत देऊ केली आहे. त्यांनी यासाठी पंतप्रधान कार्यालया एक मेल द्वारे पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेटीची वेळ मागितली आहे. पंतप्रधान कार्यालयाने त्यांना आगामी एक दोन दिवसात त्यांना मोदींच्या भेटीची निश्चित वेळ दिली जाईल असे सांगण्यात आले आहे. ते ही मदत त्याच्या करपात्र उत्पन्नातून देणार आहेत. एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पुलवामा झालेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत 40हून अधिक जवानांनी आपला जीव त्या घटनेत गमावला आहे.

मी सेना आणि त्यांच्या कुटुंबियांना काही मार्गाने मदत करू शकतो, म्हणूनच राष्ट्रीय मदत निधीमध्ये मदत करण्याचा निर्णय घेत आहे. 25 फेब्रुवारीला ई-मेल करुन पंतप्रधान कार्यालयाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी एका भेटीची मागणी केली आहे. त्याला पीएमओमधील कुमार दास यांनी प्रतिसाद देत मुर्तझा यांच्याकडे त्यांच्या संदर्भातील माहिती मागितली आहे. मुर्तजा यांनी पीएमओला प्रोफाइल, पॅन कार्डसह रक्कम पूर्ण तपशील पाठविला आहे.

त्यानंतर 1 मार्च रोजी पीएमओचे उत्तर आले की एक दोन दिवसात तुम्हाला भेटीची वेळ आणि तारीख सांगण्यात येईल. मुर्तझा यांनी सांगितले की, पंतप्रधानांकडे 110 कोटींचा चेक सुपुर्त केला जाईल. त्याचबरोबर सामाजिक कार्यासाठी नवीन योजना आणि काही नवीन तंत्रज्ञानांविषयी यावेळी आपण बोलणार आहोत. मर्तझा सांगतात की आम्ही निधीमध्ये 110 कोटी रुपये देण्यासाठी संपूर्ण कागदपत्र पूर्ण केले आहेत. पीएमओच्या निर्देशानुसार आम्ही चेक किंवा डीडीद्वारे पैसे देणार आहोत. आता ते पीएमओकडून येणाऱ्या उत्तराची वाट पाहत आहेत.

मुर्तझा जन्मापासून आंधळे आहेत आणि त्यांनी कोटा कॉमर्स कॉलेजमधून पदवी घेतली आहे. त्यांचा ऑटोमोबाईलचा खानदानी व्यवसाय आहे. ते अंध असल्यामुळे, त्यात नुकसान होत होते. त्यातच त्यांनी मोबाईल आणि डिश टीव्हीच्या क्षेत्रात काम केले. ते 2010 मध्ये काही कामासाठी जयपूरला गेले. तिथे ते एका पेट्रोल पंपावर गेले, त्यावेळी पेट्रोल घेताना एक तरुण तेथे आला आणि फोनवर बोलू लागला. त्यावेळी पेट्रोलपंपाला आग लागली. ते कारण जाणून घेण्यासाठी अभ्यास करायला लागले. अशा प्रकारे त्यांनी इंधन बर्न विकिरण तंत्राचा शोध लावला. या तंत्रज्ञानाद्वारे, कोणत्याही वाहनास GPS, कॅमेरा किंवा इतर कोणत्याही डिव्हाइसशिवाय शोधता येऊ शकेल. आता त्यांना एका कंपनीसोबत झालेल्या व्यवहारातून चांगली रक्कम मिळाली आहे.

Leave a Comment