तुम्हाला माहित आहे फेसबुकचे हे नवे फिचर ?

facebook
सोशल मीडियात अग्रेसर असलेले फेसबुक हे आपल्या युझर्संना दरवेळी काही ना काही नवीन फिचर देण्याचा प्रयत्न केला जातो. फेसबुक आपल्या युझर्सला नवीन फिचर्स, नवीन इमोजी असे सतत काहीतरी नवीन देत असते. फेसबुक यावेळी देखील तुमच्यासाठी डार्क मोड हे इमोजी घेवून आले आहे. ही इमोजी देखील युझर्सला नक्की आवडणार अशीच आहे.

इतके दिवस तुम्ही ज्या ‘डार्क मोड’ फिचरची तुम्ही वाट पाहत होता ती इमोजी अखेर फेसबुकने तुमच्या भेटीसाठी आणली आहे. डार्क मोड इमोजी वापरायला काही युझर्सने सुरूवात देखील केली. पण, यावर अद्याप काम सुरू आहे. तुम्हाला फेसबुक मेसेंजरवरून चंद्राची इमोजी पाठवायची आहे. त्यानंतर ‘You found Dark Mode!’ असे पॉप अप येऊन डार्क मोड फिचर्स अॅक्टीव्ह होईल.

आणखी काही बदल या फिचर्सच्या डिझाईनमध्ये केले जात असून शिवाय, हे फिचर तुम्ही Enable केलात तर तुम्हाला यावर अद्याप काम सुरू आहे, असे पॉपअप येईल. यानंतर फिचर्सबद्दलची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली असेलच. पण तुम्ही काहीही काळजी करून नका, हे फिचर अँड्रॉईड आणि आयएसओ मोबाईल धारकांना वापरता येणार आहे.

Leave a Comment