दुसऱ्या पुरुषात जीव रंगल्यावर ‘या’ देशातील स्त्रिया मोडतात लग्न

kalash-community
कलाशा नावाची सर्वात अल्पसंख्याक जमात पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सीमेवर राहते. आपल्या काही आधुनिक परंपरांसाठी पावणेचार हजाराची लोकसंख्या असलेली ही जमात प्रसिद्ध आहे. या जमातीचे विशेष म्हणजे या जमातीतील महिलांना एखादा दुसरा पुरूष आवडला तर त्या आपल्या पहिल्या पतीशी काडीमोड घेऊन दुसऱ्या पुरूषाशी लग्न करतात.
kalash-community1
खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील चित्राल घाटाच्या बाम्बुराते,बिरीर आणि रामबुर क्षेत्रामध्ये हा समुदाय राहतो. हिंदू कुश पर्वतांनी हा भाग वेढला आहे. या जमातीतील स्त्री-पुरूष उत्सवादरम्याम एकत्र मद्यपान करतात. बासरी आणि ड्रमच्या तालावर नृत्य करतात. तेथील लोक अफगाण-पाकिस्तानी नागरिकांच्या भीतीमुळे कायम स्वरक्षणासाठी बंदुका ठेवतात.
kalash-community2
या जमातीतील बहुसंख्य महिला लघुउद्योगांच्या माध्यमातून पैसे कमावतात. त्यांनी तयार केलेल्या पर्स आणि रंगीबिरंगी माळा पुरूष मंडळी शहरात जाऊन विकतात. नटायची भारी शौक असलेल्या या महिला डोक्यावर खास टोपी आणि गळ्यात रंगीबिरंगी माळा घालतात. तिथे वर्षभरात Camos, Joshi आणि Uchaw असे तीन सण साजरे होतात. याच सणासुदीच्या जल्लोषात तरूण-तरूणी एकमेकांच्या प्रेमात पडतात.
kalash-community3
या जमातीतील स्त्रियांना पाकिस्तानसारख्या मागासविचारांनी बुरसटलेल्या देशात मनासारखा जोडीदार निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्याचबरोबर ज्याच्याबरोबर लग्न केले आहे त्याच्यासोबत त्या खूश नसतील तर त्या दुसरा साथीदार निवडू शकतात. पण आधुनिक विचारांसोबतच येथेही काही कडक नियम आहेत. जसे की मासिक पाळीच्या वेळी त्यांना अपवित्र मानतात, यावेळी कुणालाही स्पर्श करता येत नाही. यासाठी त्यांना घराच्या बाहेर बनलेल्या बशाली नामक घरामध्ये ठेवतात. त्या घराच्या भिंतीवर ‘इसे छुना मना है’ असे लिहिलेले असते.
kalash-community4
खूप वेगळ्या अशा या जमातीच्या परंपरा आहेत. तेथील लोक एखाद्याच्या मृत्यूनंतर शोक करत नाहीत तर क्रियाकर्माच्या वेळी हे लोक आनंदाने नाचत मद्यपान करतात. ते मानतात की, देवाच्या कृपेनेच लोकांचा जन्म-मृत्यू होतो. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाल्यानंतर सर्वात जास्त त्रास कलाशा जमातीवर झाला आहे. याआधी पर्यटनामुळे त्यांचे घर चालते. पण आता पर्यटक येत नसल्यामुळे त्यांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. आता नवी पिढीही दुसऱ्या देशात स्थायिक व्हायच्या विचारात आहे.