एप्रिलमध्ये विवाहबद्ध होणार मलायका-अर्जुन!

arjun-kapoor
बी-टाऊनमध्ये गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान अभिनेत्री करिना कपूर आणि प्रियांका चोप्रा यांनी कॉफी विथ करण शोमध्ये दोघांच्या डेटिंगवर मोहोर लावली असतानाच या दोघांच्या लग्नाची बातमी आता समोर येत आहे. या बाबत या दोघांनी अद्याप काही खुलासा केला नसला तरी या दोघांच्या लग्नाची तारीख आणि त्यासंबंधीची काही माहिती समोर आली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांचे लग्न यावर्षाच्या एप्रिलमध्ये होणार आहे. अगदी खाजगी पद्धतीने हे लग्न पार पडणार आहे. या सोहळ्याला कुटुंबातील जवळचे मित्रच उपस्थित असतील असे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर हे हे लग्न ख्रिश्चन पद्धतीने असे देखील सांगण्यात येत आहे. मलायकाची बहीण अमृता अरोरानेही ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले होते. मलायकाला जसे हवे तसे लग्न अर्जुन करणार आहे.

18 वर्षांनंतर मलायकाने अरबाजशी फारकत घेतली. घटस्फोटानंतर अरहानची कस्टडी आईकडे राहिली. अरहान शक्यतो लाइमलाइटपासून दूर राहतो. नुकताच तो आईसोबत अर्जुन कपूरला भेटला होता. मलायका आणि अर्जुनसोबतचे अरहानचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. दरम्यान, मलायकाने करिना कपूरच्या चॅट शोमध्ये घटस्फोटानंतरची अरहानची प्रतिक्रियाही सांगितली. मलायका करिनाला म्हणाली की, अरहानने हे स्वीकारले आहे. त्याला आमच्या दोघांमध्ये बदल दिसत आहे. जेव्हा आमच्या दोघांचा घटस्फोट झाला होता तेव्हा अरहान मला म्हणाला होता की, तू फार आनंदी दिसत आहे.

Leave a Comment