दर तीन वर्षांत एकदा या देशात सुंदर पत्नीसाठी होतो लिलाव

bride
बुल्गारिया – बुल्गारियातील स्टारा जागोर नावाच्या ठिकाणी तीन वर्षातून एकदा नवरींचा बाजार भरतो. तरुण मुलगा येथे येऊन आपल्या पसंतीच्या मुलीची चक्क खरेदी करून तिला पत्नी बनवू शकतो. अशा गरीब लोकांकडून हा मेळावा अर्थातच लग्नाचा बाजार लावलो जातो ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही. ते जेणेतरून आपल्या मुलीचे लग्न लावून देऊ शकतील. विशेष म्हणजे, बुल्गारियाला 3 मार्च याच दिवशी ऑटोमन घराण्याच्या साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळाले होते.
bride1
चांगल्या कपड्यात तरुणींना म्हणजे नवरी मुलीला नटवून बसवले जाते. विकली जाणाऱ्या नवरीत सर्व वयोगटातील महिला असतात. तरुणासोबत नवरी खरेदी करण्यासाठी त्याचे आई-वडिलही येतात. प्रथम आपल्याला आवडेल अशी मुलगी नवरा मुलगा शोधतो. त्यानंतर बोलणी चालणी होतात. तो नवरी पसंत आल्यानंतर आपल्या आई-वडिलांना सांगतो मग दोन्ही वर-वधूचे पालक खरेदीची रक्कम ठरतात. बुल्गारियात नवरी खरेदीचा हा प्रकार गरीब लोकांत परंपरेने चालत आहे. त्याला कोणताही कायदा रोखू शकत नाही.
bride2
गरीब लोकांची आर्थिक स्थिती ध्यानात घेऊन ही प्रथा सुरु केली होती. असेच लोक बाजारात येतात ज्यांची मुलीचे लग्न करण्याची आर्थिक कुवत नसते. नवरी मुलगी बाजारात एकटी येत नाही. परिवारातील सदस्य तिच्यासमवेत असणे आवश्यक असते. नव-या मुलाला आपल्याकडे हुंडा दिला जातो. पण तेथे याच्या उलट प्रथा आहे. मुलाच्या पालकांना येथे मुलीच्या पालकांना पैसे द्यावे लागतात. यामुळे गरीबांना आर्थिक मदतही होते. हे गृहित धरूनच कायदा त्याला परवानगी देतो. तसेय याचे काटेकोरपणे पालन केले जाते. बुल्गारियातील कलाइदझी समुदायाद्वारे हा बाजार लावला जातो. या समुदायातील मुलीशिवाय बाहेरील व्यक्ती नवरी म्हणून स्वीकारली जात नाही.

Leave a Comment