गोष्ट 62 वर्षांत 28 वेळा निवडणूक लढवणाऱ्या श्यामूबाबू सुबुधी यांची

shyambabu-subudhi
आज आम्ही तुम्हाला एक अशा व्यक्तीची माहिती सांगणार आहोत, ज्यांनी गेल्या 62 वर्षांत एकूण 28 निवडणुका लढवल्या आहेत. पण त्यांना एकाही निवडणुकीत त्यांना विजय मिळवता आलेला नाही. त्या व्यक्ती आहेत श्यामूबाबू सुबुधी.

ओदिशामध्ये राहणारे 84 वर्षीय श्यामबाबू सुबुधी यांना निवडणुका लढवण्याचा छंद असून ते सलग 28 निवडणुकांमध्ये पराभूत झाल्यानंतर देखीव आता ते यंदा होणारी लोकसभा निवडणूक लढवण्याचा चंग बांधला आहे. सुबुधी 1957 पासून निवडणुका लढवत असून त्यात त्यांनी 10 वेळा विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत. त्याचबरोबर नऊ लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावले आहे.

1957 साली श्यामबाबू यांनी सर्वप्रथम तत्कालीन मंत्री वृंदावन नायक यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. श्यामबाबू त्याबाबत म्हणतात की, मंत्री नायक यांच्याविरोधात हिंजली मतदारसंघातून मी निवडणूक लढवली होती. माझा त्यावेळी पराभव झाला होता. मी त्यावेळी केवळ 22 वर्षांचा होतो. दरम्यान मी 1962 पासून नियमितपणे निवडणुका लढवण्यास सुरुवात केली. निवडणुका लढवणे हाच माझ्यासाठी तेव्हापासून एकमेव ध्यास बनला आहे. निवडणुकीत जय-पराजय होणे मला महत्त्वाचे वाटत नाही. त्याचबरोबर एक दिवस असा येईल की लोकांना माझे महत्व पटेल आणि ते मला निवडून देतील अशी त्यांना अपेक्षा आहे.

श्यामबाबू सुबुधी हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते आपल्याकडील बहुतांश कमाई ही निवडणुकांवरच खर्च करतात. यंदा गंजम जिल्ह्यातील अस्का आणि बरहामपूर मतदारसंघातून श्यामबाबू हे निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, त्यांनी पत्रके वाटून पुढील निवडणुकीसाठीच्या आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे.

Leave a Comment