रणवीरच्या आणखी एका सिक्रेटचा दीपिकाकडून भांडाफोड

ranver-kapoor
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात बी टाऊनचे प्रसिद्ध जोडपे अर्थात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे विवाहबद्ध झाले. त्यानंतर हे जोडपे कायमच चर्चेत आहे. तसेच रणवीरच्या दोन्ही चित्रपटांना मिळालेल्या यशाचे सेलिब्रेशन करताना देखील दीपिका दिसली. त्यातच कामाचा कितीही ताण असला तरी रणवीर सिंह हा सदा सर्वदा अत्यंत उत्साही असल्याचे आपण पाहिलेच आहे. पण त्याचा उत्साह कधी कधी त्याच्या अंगलट देखील आल्याचे आपल्याला माहितच आहे. आता खुद्द दीपिकानेच त्याच्या सदा सर्वदा उत्साही रहाण्यामागील सिक्रेटचा भांडाफोड केला आहे.

दीपिका आणि रणवीर दोघांनीही लग्नानंतर बऱ्याच माध्यमांना मुलाखती दिल्या आहेत. लग्नानंतरचे त्यांचे आयुष्य कसे सुरु आहे, याबाबत चाहत्यांनाही जाणून घ्यायचे असते. त्यामुळे रणवीरचे घरातील वागणे कसे आहे. त्याचा उत्साह नेहमी कशामुळे टिकून राहतो, याबद्दल दीपिकाने चर्चा केली.

एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत दीपिका म्हणाली, की सकाळी ब्रेकफास्टच्यावेळी मी रणवीरला बदाम आणि नारळपाणी देत असते. त्याच्या एनर्जीचे हेच रहस्य आहे. त्याच्याकडे अनेक चांगल्या गोष्टी आहेत. तो कामाच्या बाबतीतही अत्यंत चोख असतो. तो एखाद्या भूमिकेत एकरुप होतो. तो अत्यंत संवेदनशील आहे. लहान मुलांसारखा निरागस देखील असल्याचे तिने सांगितले. लग्नानंतर रणवीरचे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. दीपिकाही लवकरच मोठ्या पडद्यावर झळकण्याच्या तयारीत आहे. लवकरच ती ‘छपाक’ या चित्रपटात झळकणार आहे. तर रणवीर सिंग हा ‘८३’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Leave a Comment