‘स्टुडंट ऑफ द ईअर २’मध्ये आलियाचा कॅमिओ

aalia-bhatt
करण जोहरच्या २०१२ साली आलेल्या ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ चित्रपटाच्या माध्यमातून आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस यश मिळवले होते. आता या चित्रपटाचा सिक्वल येऊ घातला आहे. या चित्रपटाद्वारे बॉलीवूडला दोन नवे चेहरे मिळणार आहेत.

टायगर श्रॉफ यात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू असून चित्रपटातील एका गाण्यावर टायगरसोबत आलिया थिरकताना दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटात टायगरव्यतिरिक्त तारा सुतारिया आणि अनन्या पांडे देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, टायगर आणि आलियाच्या या गाण्याच्या चित्रीकरणाला पुढच्या आठवड्यात सुरूवात होणार आहे. आलिया आणि टायगरची जोडी या निमित्ताने पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार असल्याने दोघांच्या चाहत्यांसाठी हे गाणे अधिक खास ठरणार आहे.

Leave a Comment