
‘केदारनाथ’ या चित्रपटाद्वारे स्टारकिड सारा अली खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर साराने ‘कॉफी विथ करण’च्या एका भागामध्ये कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा बोलून दाखवली. साराची ही इच्छा आता लवकरच रिअल लाईफमध्ये नाहीतर रिल लाईफमधून पूर्ण होणार आहे.
कन्फर्म! कार्तिकसोबत स्क्रिन शेअर करणार सारा अली खान
ही जोडी इम्तियाज अलीच्या आगामी चित्रपटात एकत्र झळकणार आहे. चित्रपटात कार्तिक आर्यन आणि सारा यांच्याव्यतिरिक्त रणदीप हुड्डादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत कार्तिक आर्यनने इम्तियाज अलीसोबत एका चित्रपटात काम करत असल्याचे म्हटले आहे. यासोबतच इम्तियाज अली नेहमीच माझा आवडता निर्माता होता आणि पहिल्यापासूनच त्याच्यासोबत काम करण्याची आपली इच्छा असल्याचे कार्तिकने म्हटले आहे. १० वर्षांपूर्वी आलेल्या ‘लव आज कल’ चित्रपटाचा हा चित्रपट सिक्वल असल्याचे म्हटले जात आहे. सैफ अली खान आणि दीपिका यात मुख्य भूमिकेत झळकले होते. मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली आणि पंजाबमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण केले जाणार आहे.
