आपल्याच वैमानिकाला पाकड्यांनी भारतीय समजून ठेचून केले ठार

f16
नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांचा २७ फेब्रुवारीच्या सकाळी आमना-सामना झाला. यावेळी आपले आणि पाकिस्तानचे विमान कोसळले. पॅराशूटच्या सहाय्याने दोन्ही विमानातील जवान सुखरुप खाली उतरले होते. पण दोन्ही वैमानिकांच्या नशीबात काही वेगळेच लिहून ठेवले होते. पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे सुखरुप आपल्या देशात पोहचले, पण त्याचवेळी पाकिस्तानच्या एफ 16 विमानाच्या वैमानिकाला यमसदनी जावे लागले. त्या वैमानिकाला त्यांच्याच नागरिकांनी भारतीय समजून ठेचून ठार केले.

एफ १६ विमानाचे पाकिस्तानी हवाई दलाचे वैमानिक शाहनाज उड्डाण करत होते. यावेळी भारतीय विमानाने एफ १६ विमानाचा वेध घेतला होता. शाहनाज यांनी यानंतर पॅराशूटच्या सहाय्याने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये लँण्डिंग केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, शाहनाज सुखरुप खाली उतरण्याआधीच जखमी झाले होते. त्यांचा गणवेश फाटला होता. यावेळी तेथील लोकांना हा भारतीय वैमानिक असल्याचा गैरसमज झाला आणि त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने शाहनाज यांचा मृत्यू झाला.

पाकिस्तानी जनतेने भारतीय वैमानिक अभिनंदन यांनाही घेरले होते. पण पाकिस्तानी लष्कराने ऐनवेळी तिथे पोहोचून त्यांना आपल्या ताब्यात घेतले होते. पण यात शाहनाज कमनशीबी ठरले. भारतीय वैमानिक अभिनंदन यांच्याप्रमाणे शाहनाज याचेही कुटुंब सैन्यात आहे. त्यांचे वडील पाकिस्तानी हवाई दलात होते. त्यांनी मिराज आणि एफ १६ विमानांचे उड्डाण केले आहे.

Leave a Comment