क्रुरकर्मी मसूद अझरच्या किडन्या खराब, पाक लष्कराच्या रुग्णालयात होते डायलिसिस

masood-azhar
नवी दिल्ली – दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अझर यांच्या किडन्या खराब झाल्या असून तो त्यांनी नियमितपणे पाकिस्तानच्या रावलपिंडी येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये डायलिसिस करत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी हे तेव्हा सांगितले जेव्हा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सांगितले की मसूद अझर आजारी आहे.

एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, अलीकडील अहवालात असे दिसून आले आहे की अझरच्या किडन्या खराब झाल्या असून तो पाकिस्तान सैन्याच्या मुख्यालयात स्थित रुग्णालयात नियमितपणे डायलिसिस करुन घेत आहे. कुरेशी यांनी गुरुवारी सांगितले की माझ्या माहितीनुसार तो पाकिस्तानमध्ये आहे. तो इतका आजारी आहे की तो आपले घरही सोडू शकत नाही.

Leave a Comment