कोण होणार करोडपतीचे सूत्रसंचालन करणार नागराज मंजुळे

nagraj-manjule
गेली कित्येक वर्ष सोनी टीव्हीच्या माध्यमातून बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन प्रेक्षकांना करोडपती होण्याच्या स्वप्नपूर्तीची वाट दाखवत आहेत. त्यातच आता सोनी मराठी महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनाही आपल्या स्वप्नांचा महाल बांधता यावा म्हणून ‘कोण होणार करोडपती’चे नवे पर्व घेऊन तुमच्या भेटीला येत आहे. पण या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन कोण करणार यावरुन संभ्रम निर्माण झाला असतानाच तो संभ्रम आता दूर करण्यात आला आहे. या शोचे सूत्रसंचालन करणार आहेत अवघ्या महाराष्ट्राला सैराट करणारे नागराज मंजुळे.

महानायक अमिताभ बच्चन यांच्यामुळे कौन बनेगा करोडपती या शोची घराघरात लोकप्रियता आहे. हाच प्रयोग काही वर्षांपासून मराठीतदेखील सुरू झाला आहे. सचिन खेडेकर यांनी मराठीतील कोण होणार मराठी करोडपती या शोच्या पहिल्या पर्वाचे सूत्रसंचालन केले तर यानंतर स्वप्नील जोशीने दुसऱ्या पर्वाचे आता तिसऱ्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी दिग्दर्शक नागराज मंजुळेकडे आहे.

येत्या सीझनचे सूत्रसंचालन नागराज मंजुळे करणार आहे. विशेष म्हणजे कोण होणार करोडपतीच्या इतिहासात पहिल्यांदाच एक कलाकार नव्हे तर दिग्दर्शक याचे सूत्रसंचालन करणार असल्यामुळे, नागराजच्या चाहत्यांसाठी हा भाग अधिक खास ठरणार हे नक्की.

Leave a Comment