जल्लादाच्या 2 पदांसाठी चक्क 100 जणांचे अर्ज

jallad
कोलंबो : कुठल्याही जेलमध्ये एखाद्या कैद्याला फाशी देण्याचे काम हे जल्लादच करतो हे काही आपल्या नवीन सांगायला नको. पण तुम्हाला कोणी सांगितले जल्लाद पदासाठी भरती निघाली आहे. तर आपला पहिला नकारच असले, बरोबरच आहे कुणालाही जल्लादचे काम करायला आवडणार नाही. पण याउलट चित्र सध्या आपल्या शेजारील देश श्रीलंकेत दिसत आहे. येथे जल्लादाच्या 2 पदासाठी चक्क 100 जणांनी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे, श्रीलंकेत जल्लाद पदासाठी ज्या 100 जणांनी अर्ज केले आहेत, त्यात एक अमेरिकन नागरिकाचा देखील समावेश आहे.

श्रीलंकेत लवकरच अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तस्करांना फाशी दिली जाणार आहे. त्यासाठी जल्लादांची भरती सुरु करण्यात आली आहे. अर्जदारांची मुलाखत घेऊन त्यांची भरती केली जात आहे. जल्लाद होण्यासाठी ज्या 100 जणांनी अर्ज केला आहे, त्यांचे सुरक्षेच्या कारणास्तव नाव किंवा कोणतीही माहिती जाहीर केली जाणार नाही.

श्रीलंकेतील दोषी गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी कायदा आहे. पण श्रीलंकेत 1976 पासून कुणालाही फाशी दिली गेली नाही. गेल्या पाच वर्षांपासून तर श्रीलंकेतील कुठल्याच तुरुंगात जल्लादाची नेमणूक करण्यात आली नाही. गेल्या वर्षी एका जल्लादाची नेमणूक करण्यात आली होती. पण तो नोकरीवर रुजु झालाच नाही. येत्या दोन महिन्यात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांना फासावर लटकवेन अशी घोषणा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी घोषणा केली होती.

दुसरीकडे, श्रीलंकेच्या न्याय मंत्रालयाने आधीच घोषणा केली आहे की, अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी 48 जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. यातील 30 जणांनी पुढील कोर्टाचे दार ठोठावले आहेत. मात्र 18 जणांना फाशी निश्चित आहे. श्रीलंकेत 2004 पासून बलात्कार, अंमली पदार्थांची तस्करी आणि हत्या हे सर्वात मोठे गुन्हे मानले जातात, मात्र या सगळ्यांची शिक्षा जन्मठेप ठेवण्यात आली आहे.

Leave a Comment