पाकची नवी नौटंकी, इम्रानचे नोबेल शांतता पुरस्कारसाठी नामांकन करा !

imraan-khan
नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्याच्या घडीला तणावाचे वातावरण असतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल पुरस्कार द्यावा अशी मागणी पाकिस्तानात जोर धरत आहे. पाकिस्तानी संसदेत इम्रान यांना पुरस्कार जाहीर करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला आहे. हा प्रस्ताव माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी मांडला आहे.

भारत-पाक दरम्यान तणाव कमी करण्याचा प्रयत्न इम्रान खान यांनी केल्याचा उल्लेख केला. माहिती मंत्री फवाद चौधरी त्यांच्या प्रस्तावामध्ये म्हणाले की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यात इम्रान खानने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यामुळे ते नोबेल शांतता पुरस्कारास पात्र आहे. त्यानंतर पाकिस्तानात #NobelPeacePrizeForImranKhan हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.

भले पाकिस्तानने शुक्रवारी रात्री भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वाघा बॉर्डरवर भारताच्या स्वाधीन केले असले तरी त्यांचा उल्लेख पाकिस्तानने युद्धबंदी असा केला आहे. अभिनंदन यांची सुटका केल्यानंतर काही मिनिटातच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करुन अभिनंदन यांचा युद्धबंदी असा उल्लेख केला. पाकिस्तान अभिनंदनच्या सुटकेमुळे इम्रान खान यांनी मोठ्या मनाचा पंतप्रधान असा आव आणत आहे, पण दहशतवादविरूद्ध कोणतीही कारवाई न केल्याने त्यांचा खरा चेहरा दिसून येतो.

Leave a Comment