स्वरा भास्करने अभिनंदन यांचा अपमान करणाऱ्या पाक अभिनेत्रीला झापले

swara-bhaskar
भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे भारतात परतले असून वाघा बॉर्डरवर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. भारताने पुलवामा हल्ल्यानंतर उत्तर देत पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर एरियल स्ट्राईक केली. भारत-पाकिस्तानमधील तणाव हा तेव्हापासून वाढत चालला आहे. त्यातच भारत-पाकच्या नागरिकांमध्ये सोशल मीडियावर एक वेगळाच वाद सध्या सुरु होता. तसेच भारतीय आणि पाकिस्तानी कलाकारांमध्येही तणाव वाढला होता. पाकिस्तानी अभिनेत्री विना मलिकने यातच सोशल मीडियावर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेवर आक्षेप घेत एक निर्लज्ज पोस्ट केली होती. त्यानंतर भारतीय अभिनेत्री स्वरा भास्करने तिला चांगलेच झापले आहे.

विनाने सोशल मीडियावर भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा एक फोटो पोस्ट केला. पाकिस्तानी लष्कराने जारी केलेल्या पहिल्या व्हिडीओमधील हा फोटो होता. विंग कमांडर अभिनंदन हे यामध्ये जखमी अवस्थेत दिसत आहेत. पाक लष्कराच्या काही जवानांनी त्यांना पकडून ठेवले आणि त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली होती. विना मलिकने या फोटोसोबत लिहिले की, आत्ताच तर तुम्ही आला आहात…. चांगला पाहुणचार होणार तुमचा. स्वरा भास्कर भारतीय जवानाचा अपमान करणाऱ्या विनाच्या या पोस्टवर चांगलीच चिडली. यावर तिने विनाला खडे बोल सुणावले आणि तिच्या या अपमानास्पद वागणुकीवर टीकाही केली.


तुम्हाला स्वत:वर आणि तुमच्या तुच्छ विचारांवर विनाजी, लाज वाटायला हवी. तुमचा उत्साह क्षणाचा आहे. आमचा जवान वीर आहे, त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आहे. कमीत कमी त्या मेजरमध्ये तरी विनम्रता होती, जो विंग कमांडर अभिनंदन यांची चौकशी करत होता.

Leave a Comment