मी पक्का आरएसएसचा, पंतप्रधान रेस मध्ये नाही –नितीन गडकरी

nitin
शुक्रवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ते पक्के आरएसएसवाले असून पंतप्रधान शर्यतीत नाही असे स्पष्ट केले. ते म्हणाले माझ्यासाठी देशहित हे पहिले प्राधान्य असून आम्ही पंतप्रधान मोदी यांच्यामागे उभे आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप पूर्ण बहुमत मिळवेल आणि मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपाला आगामी लोकसभेत खंडित जनादेश मिळेल आणि त्या परिस्थितीत गडकरी सर्वसहमतीचे पंतप्रधानपदाचे बीजेपीचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरु आहे. त्याविषयी स्पष्टीकरण देताना गडकरी बोलत होते. ते म्हणाले हे म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने पाहण्यासारखे आहे. मी पंतप्रधान पदाच्या रेस मध्ये नाही. आरएसएसचे मिशन राष्ट्रकार्य हे आहे. मला एक वाईट खोड आहे. १० लाख मुस्लिमासमोर देखील मी आरएसएसचा आहे असे सांगतो. वाटल तर मत द्या. नाही दिले तरी त्याचा राग नाही असेहि सांगतो.

गडकरी म्हणाले मला जोडाजोडी जमत नाही. मी भाजपचा चांगला कार्यकर्ता आहे. देशासाठी काम करतो. देश खुश तर आम्ही खुश. भारत जगातील मजबूत आर्थिक शक्ती बनवा अशी इच्छा आहे आणि माझे विचार नेहमी सकारात्मक असतात.

Leave a Comment