शाओमीने लाँच केले १३ हजारांहून कमी किंमतीचा स्मार्ट टीव्ही

Xiaomi1
नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने दोन स्मार्टफोनसोबतच स्मार्ट टीव्हीही लॉन्च केला आहे. ‘Mi LED TV 4 A Pro’ हा ३२ इंची स्मार्ट टीव्ही कंपनीने लॉन्च केला आहे. १२,८८८ एवढी या स्मार्ट टीव्हीची किंमत आहे. यावर्षी कंपनीकडून लॉन्च करण्यात आलेला हा तिसरा एमआय टीव्ही आहे. कंपनीने याआधी जानेवारी महिन्यात ५५ इंची ‘Mi TV 4X Pro’ आणि ४३ इंची ‘Mi TV 4 Pro’ लॉन्च करण्यात आला होता.

७ मार्चपासून दुपारी १२ वाजता फ्लिपकार्ट, एमआय.कॉम आणि एमआय होमवर ‘Mi LED TV 4 A Pro’टीव्हीची विक्री सुरु होणार आहे. या नवीन ‘Mi LED TV 4 A Pro’मध्ये एचडी रेडी डिस्प्ले आणि २०W स्पीकर देण्यात आला आहे. याआधी लॉन्च करण्यात आलेल्या ५५ इंची ‘Mi TV 4X Pro’ ची किंमत ३९,९९९ रूपये आहे तर ४३ इंची ‘Mi TV 4 Pro’ ची किंमत २२,९९९ एवढी आहे.

पॅचवॉल, अॅन्ड्राइड टीव्ही सपोर्ट, क्रोमबुक, यू-ट्यूब सपोर्ट आणि गूगल असिस्टंटची सुविधा ‘Mi LED TV 4 A Pro’ हा ३२ इंची स्मार्ट टीव्हीमध्ये देण्यात आली आहे. या टीव्हीला एचडी डिस्प्ले आणि ६४ बिट प्रोसेसर देण्यात आला आहे. शाओमी Mi TV आपल्या कमी किंमत आणि उत्तम फिचर्ससाठी भारतीय बाजारात ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरला आहे. कंपनीने गेल्या वर्षी दिवाळीमध्ये Mi TVच्या विक्रीचा नवा रेकॉर्ड केला होता.

Leave a Comment