विश्वचषकात बदलणार टीम इंडियाचे रुपडे

team-india
नवी दिल्ली- याचवर्षातील मे महिन्याच्या 30 तारखेपासून क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरुवात होणार आहे. या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया नव्या जर्सीमध्ये खेळताना आपल्याला दिसणार आहे. नुकत्याच या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. तसेच आज टीम इंडिया या नव्या जर्सीसह ऑस्ट्रेलियाशी पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे. या जर्सीची नाईके प्रोयोजक असुन हा कार्यक्रम हैदराबादमध्ये पार पडला.
team-india1
माजी कर्णधार एम.एस. धोनी, कर्णधार विराट कोहली, कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, भारतीय टी20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, प्रतिभावान युवा क्रिकेटर पृथ्वी शॉ आणि महिला संघातील युवा क्रिकेटर जेमिमा रोड्रीगेज या अनावरण प्रसंगी उपस्थित होते. जर्सीत निळ्या आणि नारंगी रंगाचा वापर करण्यात आला आहे. ही नवीन जर्सीही पुनर्नवीनीकरण पॉलिस्टरपासून तयार करण्यात आली आहे. या जर्सी अनावरणावेळी बोलताना भारतीय संघाचा कर्णधार विराट म्हणाला, गेल्या दहा वर्षातील मी घातलेली ही नाईकेची सर्वोत्तम जर्सी आहे.

Leave a Comment