‘हे’ सॉफ्टवेअर करेल तुमची पीडीएफ एडिट करण्यात मदत

pdf
आजवर आपण कॉम्प्यूटरवर अनेक फाईल हाताळल्या असतील. त्यातीलच एक फॉरमॅट म्हणजेच पीडीएफ हे असून ज्याच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची माहिती एकत्रित करुन पब्लिश किंवा मेल करता येऊ शकते. पण पीडीएफ हे एक असे फॉरमॅट ज्यामध्ये काही छेडछाड म्हणजेच एडिट करता येत नसल्यामुळे आपल्या अनेक समस्यांना ऐनवेळी समोरे जावे लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक सांगणार आहोत ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला कधीही अशा समस्यांना समोरे जावे लागणार नाही.

Adobe या सॉफ्टवेअर निर्मिती करणाऱ्या कंपनीने पीडीएफ फॉरमॅटची निर्मिती केली असल्यामुळे त्याला एडिट करण्यासाठी Adobe Acrobat या सॉफ्टवेअरची आपल्याला गरज भासते. युजर्सला यासाठी Adobe Document Cloud (DC)मध्ये एक्सेस करावे लागेल. इंटरनेटवर याचे फ्री ट्रायल व्हर्जन मिळते. युजरला ट्रायलमध्ये तात्पुरत्या काळासाठी हे सॉफ्टवेअर वापरता येते.

Adobe Acrobat मध्ये जाऊन फाईलवर क्लिक करा. त्यानंतर एडिट करायची असलेली पीडीएफ फाईल ओपन करा. फाईलचा कंटेन्ट Acrobat विंडोमध्ये दिसणार. Edit पीडीएफ टूलवर जा. तुम्हाला उजव्या बाजूला सिलेक्शन टूल मिळणार. पीडीएफ फाईलमध्ये तुम्हाला जे एडिट करायचे आहे ते ओपन करा. तुम्हाला बॅकग्राउंड, लिंक, हेडर आणि अन्य टूल्स मिळणार ज्यांना तुम्ही पीडीएफमध्ये अप्लाय करू शकता. तुम्ही हे अॅपमध्ये ही करू शकता. याचे अॅप सुद्धा उपलब्ध आहे. याशिवाय पेड व्हर्जनही उपलब्ध आहे.

हे एक थर्ड पार्टी सॉफ्टवेअर असून याला फ्रीमध्ये डाउनलोड करता येऊ शकते. या अॅपमध्ये युजर्स पेजला स्प्लिट, स्पेल चेक, ट्रान्सलेट, कमेन्ट अॅड करणे आणि एक्सटर्नल लिंक्सला इन्सर्ट करू शकतात. Javascript इंजिन्ससाठी प्लगइन्स, फाईल बॅकअप, कस्टम स्टॅम्पस अन्य सॉफ्टवेअरही उपलब्ध आहेत.

तुम्हाला पीडीएफ ऑनलाईन एडिट करण्यासाठी हा चांगला विकल्प आहे. मात्र यामध्ये काही लिमिटेशन्सही आहेत. यामध्ये २०० पेज एडिट करता येतात. ५० एमबीपेक्षा जास्त पीडीएफ या एडिटरमध्ये एडिट करता येत नाहीत. अतिरिक्त फंक्शन्ससाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन पॅकेजचा वापर करावा लागेल.

Leave a Comment