कट्टरवाद्यांबद्दल पोस्ट शेअर केल्याने सोनम कपूर झाली ट्रोल

sonam-kapoor
भारत आणि पाकिस्तानमधील वातावरण सध्या भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या एरियल स्ट्राईकनंतर कमालीचे तणावाचे आहे. अशा तणावाच्या वातावरणात अभिनेत्री सोनम कपूरने एक पोस्ट शेअर केल्यानंतर ती ट्रोल झाली आहे. सोनमने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजवर ‘ह्युमन ऑफ हिंदुत्व’ या फेसबुक पेजवरची पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये कट्टरवाद्यांबद्दल लिहिले होते.

सोनमने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये काही कट्टरवादी मुस्लिम पाकिस्तानात आहेत. तर काही कट्टर हिंदू भारतात. जे द्वेषाची भाषा बोलतात. या दोन्ही कट्टरवाद्यांना युद्ध हवे आहे. पण त्यांना या युद्धाच्या परिणामांची चिंता नाही. दोन्ही देशात सामान्य माणसे आहेत. ज्यांना शांती हवी आहे. जे नोकरी करून आपल्या मुलांचे योग्य पालनपोषण करू इच्छितात…’, अशा आशयाची पोस्ट शेअर केली आणि तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले.

काही तर तिची तुलना थेट पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकसोबत केली. सोनमने आज दहशतवाद्यांशी हिंदूंची तुलना करून आपली पातळी दाखवली, अशा शब्दांत एका युजरने तिला ट्रोल केले. सोनमने शेअर केलेल्या या पोस्टच्या मूळ लेखकाने मात्र सोनमची बाजू घेत तिचा बचाव केला.

Leave a Comment