
ऐतिहासिक चित्रपटांसाठी ओळखले जाणारे बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते संजय लीला भंसाळी यांनी आजवर बॉलीवूडमध्ये अनेक सुपर डुपर हिट चित्रपट दिले आहे. अनेक कलाकारांना त्यांनीच बॉलीवूडमध्ये ओळख दिली आहे. आता संजय लीला भंसाळी बॉलीवूडमध्ये आणखी एक नवा चेहरा लाँच करणार आहेत. हा नवा चेहरा त्यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे.
या नव्या चेहऱ्याला लाँच करणार संजय लीला भंसाळी
त्यांच्या आगामी चित्रपटात त्यांची बहिण बेला सहगल यांची मुलगी शर्मिन सहगल ही झळकणार आहे. भंसाळी यांनी तिच्या बॉलिवूड पदार्पणासाठी तिला स्वत: प्रशिक्षण दिले आहे. याबाबत एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, जावेद जाफरी यांचा मुलगा मिझान जाफरी याच्यासोबत ती स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. २०१९च्या शेवटी हा चित्रपट प्रदर्शित होईल, असे बोलले जात आहे.
शर्मिनच्या याबाबत सांगते, की मी अभिनयाच्या क्षेत्रात जेव्हा पदार्पण करण्याचे ठरविले, मी तेव्हा आपल्या अभिनयातून भावना कशा दाखवता येतील यावर जास्त तयारी केली. अनुभवातून मला आणखी शिकता येईल, असेही ती एका माध्यमाशी बोलताना म्हणाली.
