‘लॉर्डस’मधील सन्मान फलकाचा ताबा घेणार महिला क्रिकेटपटू

lords
लंडन – आतापर्यंत क्रिकेटची पंढरी अर्थात ऐतिहासिक लॉर्डस स्टेडियममधील हॉलच्या सन्मान फलकावर पुरुष क्रिकेटपटूंची नावे झळकली आहेत. पण यापुढे या सन्मान फलकांवर महिला क्रिकेटपटूंची दखल घेतली जाणार आहे. यावर्षापासून महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेण्याचा निर्णय 135 जुन्या मेर्लिबोन क्रिकेट क्लबने घेतला आहे.

आता या फलकावर पुरुषांसोबतच महिला क्रिकेटपटूंचीही नावे झळकणार असून त्यानुसार या फलकावर झळकण्याचा मान इंग्लंडची गोलंदाज ऍना श्रुबसोल हिला मिळाला आहे. या फलकावर लॉर्डसच्या मैदानावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकाविणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या लिसा केईघटली आणि इग्लिंडच्या क्‍लेरी टेलर, सारा टेलर, कॅरोलिन ऍटकिन्स यांची नावे झळकणार आहे. सन्मान फलकावर नाव येणे ही आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचे मत अनेक महिला क्रिकेटपटूंनी व्यक्त केले आहे. याआधी कसोटी क्रिकेटमधील शतकवीर आणि पाच गडी बाद करणाऱ्या पुरुष खेळाडूंची नावे येथे प्रसिध्द केली जात होती.

Leave a Comment