चीन हवाई हद्दीत पाकिस्तानी विमानांना प्रवेश करण्यास मनाई

airport
बीजिंग – पाकिस्तानमधून चीनपर्यंत होणारी हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. त्याचबरोबर चीन हवाई हद्दीत पाकिस्तानी विमानांना देखील बंदी घालण्यात आली आहे. चीनने हा निर्णय भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण असल्याने घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानी हवाई हद्दीतून प्रवास न करण्याचा निर्णय अनेक देशांनी घेतल्याने युरोप आणि दक्षिण पूर्व आशियातील विमानतळांवर हजारो प्रवासी अडकून पडले आहेत.

पाकिस्तान आणि पाकिस्तान-भारत सीमारेषेवरुन आखाती देशांमधील अनेक विमाने उड्डाण करतात. चीनला जाण्यासाठी या सर्व विमानांना मार्ग बदलावा लागत असून भारत, म्यानमार किंवा मध्य आशियाच्या हवाई हद्दीतून प्रवास करावा लागत आहे अशी माहिती सिव्हिल एव्हिएशन एक्स्पर्टने ग्लोबल टाइम्सला दिली आहे. बुधवारी आणि गुरुवारी बीजिंग कॅपिटल आंतरराष्ट्रीय विमानतळाने पाकिस्तानमधून ये-जा करणाऱ्या विमानांची वाहतूक बंद केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, दर आठवड्याला पाकिस्तानातून 22 विमाने उड्डाण करतात.

Leave a Comment