अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत जाहिर प्रवेश

amol-kolhe1
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अभिनेते अमोल कोल्हे यांनी प्रवेश केला आहे. अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. सोशल मीडियावर त्यावेळीच अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, अमोल कोल्हे यांनी आता अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

अमोल कोल्हे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून तिकीट दिले जाणार असल्यामुळे अमोल कोल्हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे वृत्त होते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व इतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश झाला. पण, त्यांच्या प्रवेशाचे शिवसेनेकडून वृत्त फेटाळण्यात आले होते. अमोल कोल्हेंचा आज मुंबईत अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. अमोल कोल्हे यांच्यासह बदनापूरचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांनीही भाजप सोडून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला आहे. तसेच यश मिलिंद पाटील, किशोर प्रकाश पाटील, डॉ हर्षल यशवंत पवार, वरपे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

Leave a Comment