पाकिस्तानाच दडी मारुन बसला आहे मसूद अजहर, पाक मंत्र्यांची कबुली

masood-azhar
नवी दिल्ली : जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. भारतीय हवाई दलाकडून त्यानंतर पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या कारवाईनंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढला. पाकिस्तानने या दरम्यान या हल्ल्याचा गुन्हेगार दहशतवादी मसूद अजहर याच्याबद्दल गप्पच राहणे पसंत केले होते. पण पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी आता मात्र मसूद अजहर पाकिस्तानात असल्याची कबुली दिली आहे. त्याचबरोबर मसूद खूप अस्वस्थ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कुरेशी यांनी हे वक्तव्य न्यूज चॅनल सीएनएनशी बोलताना केले आहे.

यावेळी सीएनएनशी बोलताना पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी पाकिस्तानलाही पुढे जायचे असल्याचे, म्हटले आहे. पाकिस्तानवर भारताने जेव्हा हल्ला केला तेव्हा तणाव आणखी वाढला असेही त्यांनी म्हटले. त्यांना मसूद अजहरवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटले, कोणत्याही परिस्थितीत युद्ध थांबवण्यासाठी पाऊल उचलण्यासाठी आमचे दरवाजे उघडलेले आहेत. जर भारताकडे पुरावे असतील तर बसा आणि चर्चा करा… कृपया संवाद सुरू करा आणि आम्हाला तर्कशीलपणा दाखवा, असे म्हटले आहे. माझ्या माहितीनुसार, मसूद अजहर पाकिस्तानातच आहे. तो अस्वस्थ आहे. तो एवढा अस्वस्थ आहे की आपले घरही सोडू शकत नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Leave a Comment