विराटने साजरा केला रक्षकाचा वाढदिवस

faijal
टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली खेळात भले आक्रमक वाटला तरी मनाने तो अतिशय हळवा आणि सहृदय आहे याची प्रचीती नुकतीच आली. विराटने त्याची सर्व कामे बाजूला सारून त्याचा वैयक्तिक सुरक्षा रक्षक फैजलखान याचा वाढदिवस साजरा करून त्याला छोटीशी भेटवस्तू दिली. या वाढदिवसाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओ मध्ये फैजल केक कापत आहे आणि विराट त्याच्या शेजारी उभे राहून गाणे म्हणत असल्याचे तसेच फैजलने भरविलेला केक खात असल्याचे दिसत आहे. विराट क्रिकेट मैदानाबाहेत नेहमीच त्याचा चाहत्यांशी संवाद साधताना, त्यांच्याबरोबर फोटो काढताना दिसतो. फैजल खान चा वाढदिवस विराटने साजरा केला तेव्हा फैजलला अतिशय आनंद झाला तो त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.

Leave a Comment