कुंभ मेळ्यात सैनिकांना अर्पण केली गेली गंगा आरती

aarti
मंगळवारी पाकिस्तानात घुसून भारतीय हवाई दलाने जैश ए मोहम्मदचे तळ उधवस्त केल्यावर भारतीय जवानांच्या अभिमानाने प्रयागराज कुंभ मेळ्यात जमलेल्या सर्वपंथीय साधूंची छाती अभिमानाने रुंदावली आणि सायंकाळची गंगा आरती या समुदायाने हातात तिरंगा घेऊन केली. हि आरती भारताच्या शूर सैनिकांना अर्पण केली गेली.

त्रिवेणी पूजा करताना सेनेच्या साहसाला वंदन केले गेले आणि गंगा आरती सैनिकांच्या शौर्याला समर्पित केली गेली. याचवेळी भारतीय सेनेला शक्ती आणि साहस मिळू दे अशी गंगेला प्रार्थना केली गेली. किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी भारताने केलेल्या एअर स्ट्राईक शौर्याची पताका फडकावली आणि सैनिकांना दीर्घायुष्य मिळू दे अशी प्रार्थना केली.

Leave a Comment