प्रयागराज कुंभ मेळ्यात बस परेडचे गिनीज रेकॉर्ड

buses
प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभ मेळ्यात गुरुवारी एकचवेळी ५१० शटल बस रस्त्यावर आणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविले गेले. यापूर्वी हे रेकॉर्ड अबुधाबीच्या नावावर होते. तेव्हा एकावेळी ३९० बसची परेड काढली गेली होती. उत्तरप्रदेश परिवहन मंडळाने ५१० बस परेड काढून हे रेकॉर्ड मोडले तेव्हा ३२ किमी रस्ता व्यापला गेला होता.

या मेळ्याचे शेवटचे शाही स्नान ४ मार्च महाशिवरात्रीला आहे. त्यापूर्वी तीन दिवसात तीन रेकॉर्ड नोंदविली जाणार आहेत. त्यानुसार पहिले रेकॉर्ड नोंदविले गेले आहे. दुसरे १ मार्च रोजी नोंदविले जाणार असून यात ६ हजार कलाकार एकाचवेळी पेंट माय सिटी अंतर्गत शहरातील भिंती, चौक, पूल, इमारती विविध कलाकृती रेखाटून सजविणार आहेत. २ मार्च रोजी एकाचवेळी १० हजार सफाई कामगार संकटमोचन हनुमान मंदिर, झुन्सी संगम घात, बख्शी बांध, नागवासुकी मंदिर, लाल सडक हा परिसर स्वच्छ करणार आहेत.

Leave a Comment