
अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा याच्यावर अमेरिकेने १० लाख डॉलरचे इनाम जाहीर केले आहे. शुक्रवारी या संदर्भातली घोषणा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली.
ओसामाचा मुलगा हमजावर १० लाख डॉलरचे इनाम
मंत्रालयातील अधिकारी एम टी इवनोफ या संदर्भात म्हणाले कि ओसामा बिन लादेनला अमेरिकी सील कमांडोनी पाकिस्तानातील अबोटाबाद येथे ठार केल्यानंतर हमजा याने वडिलांच्या मृत्यूचा बदला घेणार असल्याची घोषणा केली असून अमेरिका आणि आणि सहकारी देशांवर हल्ले करण्याची योजना हमजा आखत आहे याची माहिती मिळाली आहे. हमजावर लावलेले इनाम हे अमेरिका दहशद्वादविरोधात प्रत्येक हत्याराचा वापर करण्यास कचरणार नाही याचे निदेशक आहे.
गेले काही काळ अल कायदा शांत आहे पण हि वरवरची शांतता आहे याची आम्हाला जाणीव आहे असे सांगून इवनोफ म्हणाले, अल कायदाची हल्ले करण्याची क्षमता आणि इरादे आहेत याची आम्हाला खात्री आहे. हमजा याने काही दिवसापूर्वी ९/११ हल्ल्यात विमान हायजॅक करणाऱ्या मोहम्मद अट्टा याच्या मुलीसोबत लग्न केले आहे. हमजा याला अल कायदा संघटनेत मोठे पद दिले गेले आहे याची माहिती आमच्याकडे आहे.
